logo

लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ...

वसमत येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ पार पडला. भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये, असा सल्ला शिक्षकांनी दिला. या वेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनाही भावना अनावर झाल्या होत्या.
वसमत येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील दहावीच्या 11 विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ‘भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये!’, असा सल्ला शिक्षकांनी दिला. विद्यार्थ्यांनाही शिक्षकांचे आभार मानताना अश्रू अनावर झाले होते.
या प्रसंगी सेमी इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य श्री प्रमोद डोंबे इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य श्री सचिन लाटकर व प्री प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या सौ.दुर्गताई ढेपे उपस्थित होत्या. त्याच बरोबर दहावीचे वर्गशिक्षक श्री संतोष छपरे आणि दहावी वर्गाला शिकवणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी केले.

955
28228 views